Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. वाढवण बंदर प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प असणार आहे. या वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मोठमोठ्या कंटेनर जहाजांना या बंदरांवर थांबा घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असं सांगितलं जात आहे. वाढवण बंदर प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानत वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव इतिहासात कोरलं जाईल, असं म्हणत वाढवण बंदर प्रकल्पानंतर आता पालघरमध्ये एक विमानतळ उभारण्यात यावं, अशी मागणी फडणवीसांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा