लोकसभा निवडणूक निकालांत महाराष्ट्रात भाजपाच्या अवघ्या नऊ जागा निवडून आल्या आहेत. भाजपाने महायुतीसह ४५+ जागा जिंकण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात महायुतीला १७ जागांवर यश मिळालं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामाही देण्याची तयारी ठेवली होती. त्यानंतर मुंबईतल्या दादर या ठिकाणी भाजपाची बैठक पार पडली. यावेळी आमदारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पळणारा नाही, लढणारा आहे असं म्हणत रणशिंग फुंकलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी ४३.९ टक्के इतकी आहे. तर महायुतीला ४३.३ टक्के मतं मिळाली आहेत. राजकीय गणितांमुळे आपल्याला अपयश आलं आहे. मात्र भविष्यात आपण हे चित्र बदलू” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis on Vote Jihad
Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत, “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, कारण..”
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”

मी पळणारा नाही हे लक्षात घ्या

“मी पळून जणारा नाही, तर लढणारा आहे. उपमुख्यमंत्रीपद सोडलं असतं तरीही एकही दिवस घरी बसणार नव्हतोच. चारही घेरले गेल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पूर्ण ताकदीने मैदानात उतरुन सगळे किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपली प्रेरणा आहेत. माझ्या डोक्यात काही एक प्रकारची रणनिती होती, आजही आहे. आपण सगळ्यांवर विश्वास दाखवला. मी अमित शाह यांनाही भेटलो.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!

“अमित शाह यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. मला अमित शाह हेदेखील म्हणाले की माझीही भूमिका तुमच्यापेक्षा वेगळी नव्हती. आजही आपल्यावर सगळ्यांनी विश्वास दाखवला आहे. मला अमित शाह म्हणाले आत्ता जे काम सुरु आहे ते सुरु ठेवा, आपण बसून महाराष्ट्राची ब्लू प्रिंट ठरवू, असं मला अमित शाह यांनी सांगितलं आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट

दिल्लीत एनडीएच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी अमित शाह यांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. पक्षासाठी काम करायचं आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली. मात्र, तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईल, असे अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी, फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करू. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा, असा सल्लाच अमित शाह यांनी फडणवीसांना दिला.