भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. भाजपाविरोधात पत्रकारांनी बातम्या छापू नयेत, म्हणून पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा प्यायला न्यावं, ढाब्यावर जेवायला न्यावं, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय नेत्यांकडून चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपावर टीका केली जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची पाठराखण केली आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये. बावनकुळे व्यंगात्मक बोलले आहेत. त्यामुळे त्यावरून वाद निर्माण करणं, अतिशय चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
ugc on Proposed provision
यूजीसीच्या अधिसूचनांचा पुनर्विचार हवाच!
Santosh Deshmukh family expresses expectations from Ajit Pawar for justice
“अजितदादांनी प्रथम न्याय देण्याचे कार्य करावे,” संतोष देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा
delhi assembly elections
लालकिल्ला : केजरीवाल रेवड्यांचे बादशहा; मग बिरबल कोण?

हेही वाचा- बारामतीतून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…

चंद्रशेखर बावनकुळेंच्या ऑडिओ क्लिपबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला वाटतंय की, बावनकुळे काय म्हणतायत आणि त्याचा काय अर्थ निघतो, या दोन्ही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. त्यामुळे तसा अर्थ काढण्याचं काहीही कारण नाही. दुसरं म्हणजे राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांबरोबर असताना अनेकदा काही गोष्टी व्यंगात्मक बोलतात, त्या गोष्टी त्याच अर्थाने घ्यायच्या नसतात. बावनकुळेंच्या मनात कुठेही अशाप्रकारचा हेतू नाही. त्यामुळे त्यावर वाद निर्माण करणं अतिशय चुकीचं आहे.”

हेही वाचा- “…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?

अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन केलं. “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. तुम्ही ज्या बूथवर काम करताय. त्या बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपण इतकं चांगलं काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलावणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Story img Loader