उद्धव ठाकरेंनी नुकतंच पोहरा देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी भाषण करून हे सांगितलं की पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो भाजपाने फसवलं. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी पोहरा देवीची खोटी शपथ घेतली असेल आणि नंतर माफी मागितली असेल असं म्हणत २०१९ ला काय घडलं तो घटनाक्रम त्यांनी कथन केलं. तसंच आपण धर्मानेच वागतो आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१९ ला नेमकं काय झालं?

२०१९ ला काय झालं? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं पूर्ण बहुमत आलं होतं. हे मी पु्न्हा सांगतो आहे पण अलिकडच्या काळात काही लोक शपथाही खोट्या घेत आहेत. किमान पोहरा देवीला जाऊन शपथ घेतली. पण मनात त्यांनी माफी मागितली असेल आणि निश्चितपणे देवी त्यांना माफ करेल. मी आज पुन्हा सांगतोय, युतीची बोलणी सुरु होती. ती सुरु असताना एका रात्री सन्माननीय उद्धव ठाकरेंनी सांगितलं की हे सगळं जरी बरोबर असलं तरीही मी दोन दिवसांपूर्वी अमितभाईंशी बोललो होतो. मी त्यांना विनंती केली आहे की आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. मी म्हटलं मला हे सांगण्यात आलेलं नाही. तेव्हा रात्री एक वाजला होता. अमितभाईंना मी फोन केला, त्यांना सांगितलं की उद्धवजी म्हणत आहेत तुमच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे आणि ते म्हणत आहेत सीट वगैरे ठीक आहे पण मुख्यमंत्रीपद हवं आहे. मी कॉन्फिडंट नाही तुम्ही सांगा काय करायचं. त्यावेळी अमितभाई म्हणाले मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात वर्षानुवर्षे आपला फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या संदर्भात कुठलीच तडजोड होणार नाही. काही खाती जास्त हवी ती देऊ. मंत्रिपदं जास्त देऊ पण मुख्यमंत्रीपद वाटलं जाणार नाही. हे होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोलणी थांबवा आणि नंतर काय करायचं ते बघू. ते मी उद्धवजींना सांगितलं की मी अमितभाईंशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्रीपद वाटता येणार नाही. त्यावेळी मला उद्धव ठाकरे म्हणाले हे होणार नसेल तर युती करणं कठीण आहे. ते त्यांच्या घरी गेले, मी माझ्या घरी गेलो आणि सगळा संवाद संपला.

हे पण वाचा- “एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला धोका”, अजित पवारांचा उल्लेख करत एकनाथ खडसेंचं मोठं विधान!

तीन दिवसांनी काय घडलं?

तीन दिवसांनी एक मध्यस्थ माझ्याकडे आले, त्यावर ते म्हणाले की उद्धव ठाकरेंची पुन्हा चर्चेची इच्छा आहे. मी म्हटलं पुन्हा बोलायचं असेल तरीही अट तीच आहे. त्यावर ते म्हणाले की त्यांनी आग्रह सोडला आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की पालघरची जागा जी आपण जिंकलो होतो, ती आम्हाला हवी. पालघरची जागा दिली तर कार्यकर्ते नाराज होतील. त्यावेळी मला नेते असं म्हणाले की एखाद्या जागेसाठी युती तोडणं योग्य नाही. आम्ही बसलो, मुख्यमंत्रीपदाचा विषय सील झाला. पालघरची जागा त्यांना दिली. त्यानंतर युती झाली आणि मी पुन्हा सांगतो की ज्या बाळासाहेबांच्या खोलीविषयी ते वारंवार सांगतात त्याच खोलीत उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मी होतो. काही काळ आधी ते बसले होते. मला बोलवण्यात आलं सगळ्या गोष्टी दूर झाल्या आहेत आता आम्ही दोघांनी ठरवलं आहे की पत्रकार परिषदेत तू एकट्याने बोलायचं आम्ही बोलणार नाही. मी मराठीत काय बोलणार आहे ते बोलून दाखवलं. हिंदीत बोलून दाखवलं. त्यानंतर वहिनी आल्या (रश्मी ठाकरे), त्यांच्यासमोरही बोलून दाखवलं. अशा गोष्टी सांगायच्या नसतात पण मला सांगायची वेळ आली आहे. मी पुन्हा वहिनींसमोर म्हणून दाखवलं आणि तंतोतंत तेच पत्रकार परिषदेत बोललो. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे शब्द होते की मी खूप टोकाचं बोलून गेलो आहे, आमचं फेस सेव्हिंग झालं पाहिजे असं तुम्ही बोला. त्यामुळे मी अतिशय तोलामोलाच्या शब्दांमध्ये बोललो आणि ती पत्रकार परिषद संपली.

हे पण वाचा- “मला ते सहन करावं लागतं”, अमृता फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; म्हणाले “माझी पत्नी…”

२०१९ च्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हाच उल्लेख होता

त्यानंतरच्या प्रत्येक सभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उद्धव ठाकरेही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढतो आहे, आपल्याला मुख्यमंत्री फडणवीसांना बनवायचं आहे असं अनेकदा सांगितलं. निवडणूक झाल्यानंतर जसं लक्षात आलं की नंबरगेम सांगतो की इकडे तिकडे केलं तर गणित जमू शकतं. मी अधिक खोलात जात नाही. आपण त्यावेळी गाफील राहिलो होतो. प्रेमाने विश्वास ठेवला होता. नंबरगेम झाल्यावर उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यात जाहीर केलं की आमच्यासाठी सगळे दरवाजे खुले आहेत. त्यानंतर काय झालं सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर सात-आठ दिवसांनी काय झालं, राष्ट्रवादीची ऑफर कशी आली? हे सगळं अजित पवारांनी सांगितलं. मी जे काही केलं होतं ते ठरवून आणि सगळ्यांशी बोलून केलं होतं.

बेईमानी केली तर उत्तर द्यावंच लागतं

२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर जाता? हा दगा, हा खंजीर देवेंद्र फडणवीसच्या पाठीत नव्हता, देवेंद्र फडणवीस निमित्त होतं. हा खंजीर भाजपाच्या पाठीत खुपसला. ज्या भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो पक्ष उभा केला त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. याचं उत्तर देणं आपल्याला गरजेचं होतं. त्यावेळी मला अमित शाह यांनी सांगितलं की तू दहा अपमान सहन कर, पण बेईमानी सहन करु नको. जो बेईमानी सहन करतो तो टिकत नाही हे मला अमित शाह म्हणाले होते. ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी उद्धवजींचा पक्ष जिंकण्यासाठी घाम गाळला ही त्यांच्याशीही बदनामी होती. म्हणून एकच गोष्ट सांगायची की आज आपण जे करतो आहे तुमच्या मनात शंका असू देऊ नका. हा धर्म आहे हा अधर्म नाही. कर्णाची कवच कुंडलं काढल्याशिवाय कर्णावर विजय मिळवता येणार नाही हे कृष्णाला माहित होतं. दुर्योधनाला गांधारीकडे जाताना कपडे घालायला लावले. भीष्मांना पराभूत करण्यासाठी शिखंडीला उतरवलं. सूर्यास्त भासवून जयद्रथ वध करवला. सर्वात महत्त्वाचं द्रोणाचार्यांचा वध करताना धर्मराजाला सांगितलं तुला खोटं बोलायचं आहे त्यावेळी धर्मराज युधीष्ठीराने सांगितलं की मी सांगेन अश्वत्थामा गेला हे सांगेन पण नरो वा कुंज रोवा म्हणजे नर मारला की हत्ती मारला गेला माहित नाही. कृष्णाने काय केलं? युधीष्ठीर वाक्य म्हणत असताना इतक्या जोरात शंख वाजवला की द्रोणाचार्यांना अश्वत्थामा गेला इतकंच ऐकू आलं. त्यामुळे महाभारताने आपल्याला सांगितलं की हा अधर्म नाही ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. परित्राणाय साधूनाम लक्षात आहे पण विनाशाय दुष्कृताम हे देखील लक्षात ठेवावंच लागेल. अनेक लोक नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत आहेत. पण नैतिकतेने राजकारण करण्यासाठी राजकारणासह रहावं लागतं. महाभारतात श्रीकृष्णाला माहित होतं की धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावी लागते.

हे पण वाचा- उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ज्या ‘कलंक’ शब्दामुळे वाद रंगला आहे त्या शब्दाचा नेमका अर्थ काय?

मी कुणाचं घर फोडलेलं नाही

लोक म्हणतात तुम्ही दोन पक्ष फोडले, कुणी म्हणतं तुम्ही घर फोडलं. मला विचारायचं आहे की जनादेशाची हत्या करण्याचं काम कुणी केलं. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना एकच सवाल आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काय काल राजकाणात आले आहेत का? मी मोहिनी घातली आणि ते माझ्या मागे आले. असं घडलेलं नाही. ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील. आणखी एक स्पष्टपणे सांगतो माझ्या मनात संभ्रम नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात जी युती झाली ती आमची भावनिक युती झाली. वादळं आली असतील, व्यक्ती व्यक्तींचं काही झालं असेल पण भावनिक युती आहे. राष्ट्रवादी युती आहे ती राजकीय मैत्री आहे. कदाचित ती पण भावनिक मैत्री येत्या काळात होईल. पण आज हे आमच्या मनात हे स्पष्ट आहे. आज आपण देशात सगळे पक्ष एकत्र येऊन मोदीजी नको अशी भावना सातत्याने मांडत आहेत. काय केलंय मोदींनी? देशाला अकराव्या क्रमांकावरुन पाचव्य क्रमाकांच्या अर्थव्यवस्थेवर आणलं. भारताने गरिबी कमी कऱण्याचं काम दहा वर्षात जे केलंय ते अविश्वसनीय आहे हे इंटरनॅशन मॉनिटरिंग समिती सांगते. जगात भारताचा डंका वाजतो आहे. जगात सर्वाद जास्त रोजगाराच्या संधी भारतात तयार होणार आहे. आज ज्यावेळी सगळे लोक मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत तेव्हा हे म्हणून चालणार नाही की आम्ही कुणाला बरोबर घेणार नाही. जे येतील त्यांना बरोबर घेऊ पण एक गोष्ट नक्की आहे की काँग्रेसचा विचार चालणार नाही. काँग्रेसचा विचार तुष्टीकरणाचा विचार आहे. तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष आम्ही बरोबर घेणार नाही. एमआयएम, मुस्लीम लिग यांनाही आम्ही बरोबर घेणार नाही. फाळणी कुणामुळे झाली? अशा प्रकारचा विचार करणाऱ्यांमुळे झाली. देशाचं विभाजन झालं तरी तुष्टीकरणाची नीती संपलेली नाही. त्यामुळे असं कुणालाही बरोबर घेणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं. जे कुणी येतील त्यांचं स्वागत करु पण पक्षाची जी तयारी आहे ती वाया जाऊ देणार नाही.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आपल्या नव्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षपूर्ती होता होता, संपर्कसे समर्थनतक हा कार्यक्रम यशस्वी होऊन आपल्या सरकारमध्ये एक नवा सहकारीही आपल्याला मिळाला. आपल्या प्रत्येकाच्या मनात आनंद आहे, कुतूहल आहे प्रश्नही आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. खरंतर आपल्या पक्षाचा प्रवास हा इतिहासात जाऊन पाहिला तर हा प्रवास हा विरोधापासून सुरु झाला, उपहासापर्यंत पोहचला आणि मग सर्वमान्यतेकडे गेला हे आपण भाजपाच्या बाबत पाहिलं आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपाचा उपहास केला गेला आहे

ज्या भाजपाला दोन सदस्य निवडून आले म्हणून चिडवलं गेलं. पर्याय पर्याय म्हणतात कोण? ज्यांचे निवडून आले दोन अशा प्रकारचा ज्यांचा उपहास केला गेला त्याच पक्षाने दोनपासून ३०२ पर्यंत मारलेली मजल आपण पाहिली. जगातला सर्वात मोठा पक्ष हा भाजपाही आपण पाहिला. जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा जो आपला प्रवास आहे त्यात आपण उपहास पचवला आहे, अन्याय पचवला आहे. अनेक प्रकारचं विषही पचवलं आहे. १९७७ मध्ये आपल्या जनसंघाचं अस्तित्त्व जनता पार्टीत विलीन केलं. सर्वाधिक खासदार निवडून आल्यानंतरही मोरारजी देसाईंना पंतप्रधान करण्याचं काम आपण केलं. जनता पक्ष फुटला तेव्हा नव्याने भारतीय जनता पार्टी स्थापन करुन तीच शक्ती संघटित करण्याचं काम केलं. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संयम होता, नेतृत्वावर विश्वास होता. संयम आणि विश्वास या दोन गोष्टींच्या शिदोरीवर भाजपा उभी राहिली. अनेक संक्रमणं आपण पाहिली आहेत.

आपल्याला मेहबुबा मुफ्तींसहही जावं लागलं कारण..

कधीतरी आपल्याला देशाकरता मेहबुबा मुफ्तींसहही जावं लागलं. काही जणांनी टीका केली. पण संपूर्ण जगासह पाकिस्तान हे सांगत होता की लोकशाहीची स्थिती काश्मीरमध्ये नाही तिथे आपण निवडणुका घेऊन दाखवल्या आणि आवश्यकता पडली तेव्हा त्या सरकारला लाथही मारली. काश्मीरमधलं ३७० कलम हटवणं हे आपलं लक्ष्य होतं. धोरण म्हणून आपण काही निर्णय घेतले. पण ध्येय संपलेलं नाही. पाकव्याप्त काश्मीरही आपल्याला भारतात आणायचं आहे. भारतीय जनता पार्टीत आपली भूमिका काय? राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष मग आपण. नेशन फर्स्टच्या भूमिकेतून आपण करतो आहे. आपला मंत्र आहे तो म्हणजे पक्षावर, नेतृत्वावर आणि क्षमतेवरचा विश्वास. या आधारावरच भाजपा मोठी झाली आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हलाहल पचवल्याशिवाय अमृत मिळत नाही

अगदी इतिहास पाहिला तेव्हा जेव्हा पुरातन काळात समुद्र मंथन झालं तेव्हा अमृतही निघालं आणि विषही निघालं. हलाहल पचवलं तरच अमृत मिळणार होतं. शिवशंकराने हलाहल पचवलं म्हणून अमृत मिळालं. महाविजयासाठी एक कडू औषध घ्यायची आवश्यकता पडली तरीही आपली तयारी असली पाहिजे. मला ठाऊक आहे की ही तयारी आपल्या सगळ्यांची आहे. मोदींवर आपला पूर्ण विश्वास आहे. आज जे मंथन सुरु आहे त्यामध्ये संयम ठेवण्याची गरज आहे, विश्वास ठेवण्याची गरज आहे.

आपलं महाभारत सांगतं, जरासंधाने मथुरेवर वारंवार आक्रमण केलं. मथुरावासी त्रस्त होते. मग श्रीकृष्णाने दूरचा विचार केला. द्वारका वसवली आणि जरासंधाचाही नाश केला आणि कौरवांचाही नाश केला. त्यामुळे दूरचा विचार करायचा असतो विश्वास ठेवायचा असतो असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

प्रताप गडावर ज्यावेळी छत्रपती शिवरायांना अफझल खानाचा कोथळा काढायचा होता. अफझल खानाला भेटायचा निर्णय शिवरायांनी घेतला तेव्हा अनेक जण म्हणाले की महाराज मंदिरं तोडणाऱ्या माणसाला तुम्ही भेटायला जाता? पण छत्रपतींच्या डोक्यात पक्कं होतं की काय करायचं आहे. त्यांनी अफझल खानाला संपवलं आणि स्वराज्य स्थापन केला. त्यावेळी मावळ्यांच्या मनात शंका नव्हती की महाराज अफझल खानाला भेटायला का जात आहेत कारण त्यांचा नेतृत्वावर विश्वास होता.

मी जी उदाहरणं देतो आहे त्यात हे सांगू इच्छितो की मी कुणालाही अफझल खान म्हटलेलं नाही. आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत. इतिहासाचे संदर्भ, त्यातले मतितार्थ लक्षात घ्यायचा असतो. परिस्थिती अनुरुप निर्णय घेऊन काम करावं लागतं. कार्यकर्ते, सैनिक, मावळे यांच्या मनात नेतृत्वाबाबत विश्वास असतो तेव्हा अशा प्रकारचं धोरण यशस्वी होतं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.