मागील काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते, असा आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी आरोप सिद्ध करण्याचे आव्हान राणा यांना दिले होते. याप्रकरणी काल दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोघांच्या भेटीबाबत बोलताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’नंतर आता राज्यात लवकरच टेक्स्टाईल पार्क, नव्या वर्षात घोषणा होणार; फडणवीसांची माहिती

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

“बच्चू कडू हे माझ्या एका फोनकॉलवर गुवाहाटीला गेले होते. मी त्यांना फोन करून सांगितलं होतं, की आम्हाला सरकार बनवायचे आहे आणि तुमची साथ हवी आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी कोणता आर्थिक व्यवहार केला, हे म्हणणं चुकीचं आहे. इतरांचं मला माहिती नाही. मात्र, बच्चू कडूंवर अशा प्रकारचे आरोप लावणं चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जी लोक गुवाहाटीला गेली, ती पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन गेली”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – टाटा एअर बसचा प्रकल्प २०२१ मध्येच गुजरातला, उपमुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, “जाणीवपूर्वक…”

“काल मी आणि मुख्यमंत्री एकनाद शिंदे यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्याशी चर्चा केली. दोघांनीही हे मान्य केलं की, जी वक्तव्य त्यांच्याकडून झाली, ती रागात झाली आणि ती योग्य नव्हती. मात्र, आता दोघांनीही ठरवलं आहे, की अशा प्रकारे आरोप करणं योग्य नाही. त्यामुळे हा विषय आत संपलेला आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय; मला वाटतं पंतप्रधानांनी…” ; राज ठाकरेंचं विधान!

दोघांमध्ये नेमका काय वाद?

गेल्या ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदार संघातील एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राणांनी बच्चू कडू यांना डिवचलं होतं. ‘मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… हे या मतदार संघातल्या आमदाराचे ‘स्लोगन’ आहे,’ अशी टीका त्यांनी केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडूंनी रवी राणांविषयी असंसदीय शब्दांचा वापर केला. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू आहे.