श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी परिसरामध्ये मुंडके नसलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याबाबत घडलेली घटना अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी परिसरामध्ये वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असलेला एका अज्ञात व्यक्तीचा, पुरुष जातीचा मृतदेह एका पोत्यामध्ये बांधून त्याच्यामध्ये दगड गोटे भरून तो विहिरीमध्ये टाकण्यात आला होता.

ही बाब आज लक्षात आली. यानंतर संबंधितांनी तात्काळ या प्रकरणी बेलवंडी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. व विहिरी मधून मृतदेह वरती काढण्यात आला. या मृतदेहाला डोके नसून, दोन हात व एक पाय देखील तोडण्यात आल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये शव विच्छेदनासाठी घेऊन गेले आहेत. अतिशय निर्दयपणे या युवकाचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा अनोळखी युवक कुठला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस विभागाकडून सुरू झाले आहे.त्याचा मृतदेह या ठिकाणी कसा आला. त्याचा खून करण्यात आला आहे का. याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनचे मारुती कोळपे हे पुढील तपास करीत आहे.

Story img Loader