जत तालुक्यातील दरीबडची येथे अज्ञात महिलेचा व तिच्या मुलीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांना अद्याप या महिलेची ओळख पटली नसून पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर पोलिसांशीही संपर्क साधला आहे.
दरीबडची येथील वन विभागाच्या क्षेत्रात अज्ञात महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती जत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ३२ वर्षांची महिला असून तिच्या शेजारीच ६ वर्षांच्या मुलीचाही मृतदेह मिळून आला. दोघींची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीवरून स्पष्ट झाले. सदरची मृत महिला गरोदर होती. सायंकाळपर्यंत महिलेची पोलिसांना ओळख पटलेली नव्हती. उपअधीक्षक पौर्णिमा चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन या महिलेच्या संदर्भात माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलिसांचे एक पथक विजापूरलाही धाडण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा