लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सातारा : म्हसवड (ता. माण) येथील शेंबडेवस्ती येथे आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या मूकबधिर मुलाचा माण नदी पात्रात बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास माण नदीवरील म्हसवड पालिकेच्या नळपाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ घडली.
हणमंत मोहन शेंबडे (वय १८ ) रा. शेंबडेवस्ती- म्हसवड असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता दहावीच्या वर्गात सातारा येथील मूकबधिर विद्यालयात शिक्षण घेत होता. गणेशोत्सवात सुट्टी असल्याने तो गावी आला होता. त्याची आईसुद्धा मूकबधिर आहे.
आणखी वाचा-लाडक्या बहिणीचा देवा भाऊ’ कार्यक्रमात साड्या घेताना गोंधळ
दुष्काळी भागातील माणगंगा नदी सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे. त्यामुळे दोरखंडाच्या सहाय्याने नदी पार करून शेतात जावे लागत आहे. हणमंत शेंबडे हा आईला नदीच्या काठावर उभा करून दोरखंडाच्या सहाय्याने शेतातील मोटार सुरू करण्यासाठी नदी पार करत होता. मात्र, नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर त्याच्या हातातून दोरखंड निसटला आणि तो नदीच्या पाण्यात वाहत गेला. आईच्या समोर मुलगा वाहून गेला. त्या माउलीला साधे ओरडताही आले नाही. मुलगा पाण्यात वाहत गेल्याचे त्या आईनं घरी पळत जाऊन वडील मोहन शेंबडे व इतरांना सांगितले. म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस, म्हसवड पालिकेचे कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतला पण शोध लागला नव्हता.