जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी पिता-पुत्राचा बुडून मृत्य झाला. ही घटना मंगळवारी (२६ एप्रिल) दुपारी घडली. तासाभराच्या शोधकार्यानंतर बुडालेल्या पिता-पुत्राचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माणिक निर्वळ व त्यांचा १४ वर्षांचा मुलगा आकाश हे आपल्या इतर तीन नातेवाईकांसोबत मोतीतलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना आकाश बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी माणिक निर्वंळही सरसावले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पिता-पुत्र बुडाले.

हेही वाचा : वडिलांसोबत पोहण्यास गेलेल्या सहा वर्षीय बालकाचा जलतरणिकेत बुडून मृत्यू

घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांसह अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या शोधकार्यानंतर पिता-पुत्रांचे मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.