सांंगली : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव भुजंगराव माने (वय १००) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने कुपवाड येथे राहत्या घरी निधन झाले. तासगाव तालुक्यातील येळावी हे त्यांचे मूळ गाव. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. क्रांतीसिंह नाना पाटील यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी शालेय शिक्षणाचा त्याग करीत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.

तरुण मुलांचे संघटन करून प्रभात फेरी काढून ब्रिटीश सरकार विरोधात जनमत तयार करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ३ सप्टेंबर १९४२ रोजी तासगाव तहसील कचेरीवर तिरंगा फडकविण्यासाठी यशस्वी मोर्चा काढला होता. ९ सप्टेंबर १९४२ रोजी क्रांतीकारकांवर गोळीबार झाला होता. यामध्ये ९ क्रांतीकारक शहीद झाले. याला जबाबदार असलेल्या तत्कालीन फौजदाराच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्यात त्यांचा सहभाग होता.

bjp pradipsinh Jadeja marathi news
गुजरातच्या माजी गृहमंत्र्यांकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी, अजित पवार यांच्या बालेकिल्याकडे भाजपची नजर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
mumbai police marathi news
नेता अडकला, पण कार्यकर्ते खंबीर…मुंबईच्या रस्त्यावर आत्महत्येचे प्रात्यक्षिक…
Harshvardhan Patil
जिल्ह्यात महायुतीला धक्का? माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा
Kolhapur Girl assaulted and Killed
Kolhapur Girl Abuse and Murder: कोल्हापूर हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती देताना म्हणाले, “काल रात्री…”
Ravikant Tupkar, Eknath Shinde,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर शेतकरी आत्महत्येचे… रविकांत तुपकर म्हणाले..
Ramdas Kadam, Ravindra Chavan,
रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी घ्यायला हवा, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीका
Akola, Chardham Yatra, devotees, accident, uncontrolled tanker, Srikot, Garhwal, Srinagar, Uttarakhand, Badrinath, women devotees, treatment, Haridwar, Uttarakhand Police, mourning, Akola district
चारधाम यात्रेवर गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; अकोल्यातील दोन महिलांचा अपघातात मृत्यू

हेही वाचा – रायगडमध्ये निधीच्या विनियोगात मंत्री आदिती तटकरे पिछाडीवर

हेही वाचा – राज्यातील कुष्ठरुग्णांसाठी पोषण आहार योजना!

सातारा, विजापूर, धारवाड, नाशिक कारागृहात त्यांना ९ महिन्यांची शिक्षाही भोगावी लागली होती. भारत सरकारने त्यांना ताम्रपट देऊन सन्मानित केले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रातही काम करीत तासगावमध्ये विणकर सोसायटीची स्थापना केली होती.