तालुक्यातील ताज येथील पांडुरंग नरसू लष्कर (वय ३५) या तरुणास काठी व अन्य हत्यारांनी जबर मारहाण करण्यात आली. त्यात गंभीररीत्या जखमी होऊन मंगळवारी रात्री त्याचे निधन झाले. मात्र पोलिसांनी कुठलीच दखल न घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद बुधवारी उमटले.
मृताचे नातेवाईक व वडार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सुमारे तीन तास मृतदेह कर्जत पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला व आंदोलन केले. गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. अखेर पोलिसांनी आरोपींना अटक करू व संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीनंतर गंभीर जखमी अवस्थेत नरसू लष्कर याला पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. या प्रकरणी मच्छिंद्र विठ्ठल तांदळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बहिणीस त्रास देतो या संशयावरून या तरुणाला मारहाण करण्यात आली. मामू ऊर्फ अप्पा जनार्दन खरात, दादा पांडुळे, अण्णा बाळू पांडुळे, कृष्णा अप्पा खरात (सर्व राहणार, ताजू) व विक्रम भैलुमे (राहणार, कर्जत) यांनी त्याला मारहाण केली.
मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू
तालुक्यातील ताज येथील पांडुरंग नरसू लष्कर (वय ३५) या तरुणास काठी व अन्य हत्यारांनी जबर मारहाण करण्यात आली. त्यात गंभीररीत्या जखमी होऊन मंगळवारी रात्री त्याचे निधन झाले.
First published on: 20-03-2014 at 03:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of injured in beating case