नाशिक- जिल्ह्यतील राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात पत्रकारितेच्या माध्यमातून आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ पत्रकार, दै. ‘देशदूत’चे सल्लागार संपादक सुरेश नारायण अवधूत (७२) यांचे सोमवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून  व नातवंडे असा परिवार आहे. कविवर्य कुसुमाग्रज, माधवराव लिमये, डॉ. वसंतराव गुप्ते, वसंतराव उपाध्ये या विचारवंतांसोबत त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले. ‘नारोशंकर’ या साप्ताहिकातून त्यांनी लिखाणास सुरूवात केली. त्यानंतर १९७४ मध्ये देशदूतमध्ये वार्ताहर म्हणून त्यांनी कामास सुरूवात केली. या ठिकाणी त्यांची पत्रकारिता बहरली. आक्रमक लेखनशैली आणि दांडगा जनसंपर्क या बळावर त्यांनी दैनिकाची संपादकपदाची धुरा सांभाळली. नाशिक जिल्ह्यत शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेची चळवळ रुजविण्यास त्यांचा मोलाचा वाटा होता. पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य तसेच जिल्हा पातळीवरील विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of senior journalist suresh avadhuta
Show comments