दारूच्या नशेत विनयभंग करणाऱ्याला संबंधित तरुणीने खोरे मारल्याने झालेल्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना बावधन (ता. वाई) येथे घडली. या प्रकरणी तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने तिची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
या बाबत वाई पोलिसांनी सांगितले, की अनिल भगवान पवार (वय ३२, रा. हल्ली बावधन, मूळ गाव पाडळी, ता खंडाळा) हा बावधन येथे शेतमजूर म्हणून रोजदारीवर वेगवेगळय़ा ठिकाणी काम करीत होता. गाडेबाग वस्ती (बावधन, ता. वाई) येथे मागील काही दिवसांपासून शेतमजूर म्हणून काम पाहतो. दारूच्या नशेत त्याने शेतात निघालेल्या योजना शिरीष भोसले (वय २२)हिचा विनयभंग केला. या वेळी स्वसंरक्षणासाठी तिने त्याला हातातील खोऱ्याने मारले. याचा जबरी घाव बसून पवार गंभीर जखमी झाला. त्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाई पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा