तालुक्यातील मनोहरपूर येथे मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
सुयोग दत्तात्रेय भांगरे (वय १७) व नितीन दत्तात्रेय भांगरे (१५) अशी मृत भावंडांची नावे आहेत.
आज सकाळी साडेसातच्या सुमारास दाघे भाऊ सुगाव शिवारातील प्रवरा नदीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेले होते. पंपाचे बटन दाबले, तो सुरू झाला, मात्र तो पाणी खेचत नसल्याने त्यातील एक जण तारेला धरून पंपाचा फुटबॉल हलवत असताना त्याने आधारासाठी धरलेल्या तारेत वीजप्रवाह उतरल्याने त्याचा जोरदार धक्का त्याला बसला. हा प्रकार पाहून त्याला वाचवताना दुस-या भावालाही विजेचा धक्का बसला, त्यात दोघेही मृत्युमुखी पडले. बराच वेळ झाला तरी, दोघे घरी न परतल्याने घरच्यांनी शोध सुरू केला असता हा प्रकार उघडकीस आली.
अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात दोघा भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस पाटलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन भावांच्या अशा धक्कादायक निधनाबद्दल गावात शोक व्यक्त करण्यात आहे. आई-वडील आणि दोन मुले असे हे कुटुंब होते. त्यातील दोन्ही मुले या अपघातात मृत्युमुखी पडल्याने घरात आई-वडीलच राहिले आहेत.
अकोले तालुक्यातील घटना विजेच्या धक्क्य़ाने दोघा भावांचा मत्यू
प्रवरानदीकाठी असलेल्या विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला.

First published on: 21-05-2014 at 03:36 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of two brothers due to electric shock