सागरेश्वर अभयारण्यातील दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली. या पैकी एकाचा अभयारण्याच्या हद्दीमध्ये तर दुसर्याचा अभयारण्याच्या कुंपणाबाहेर मृत्यू झाला आहे.
आज सकाळी सागरेश्वर प्रवेशद्बारापासून काही अंतरावर एका हरणाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या हरणाचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याचे पार्थिव सडलेल्या अवस्थेत आढळून आले. तर कुंपण तुटलेल्या स्थितीत असलेल्या ठिकाणी मात्र, अभयारण्याबाहेर एका हरणाचे पार्थिव मिळून आले. अनेक हरणे चार्याच्या शोधात संरक्षित क्षेत्राबाहेर येतात. अभयारण्याबाहेर येणार्या हरणावर भटक्या श्वानाकडून हल्ला होण्याचे प्रकारही वेळोवेळी घडले असून अभयारण्याची संरक्षण सिध्दता चोखपणे करण्याची मागणी प्राणीमित्राकडून केली जात आहे