अलिबाग : जैन साध्वी यांना सोबत चालत जाणाऱ्या भक्ताचा अपघाती मृत्यू झाला. मीत विनोद जैन वय १८ असे अपघातात मृत्यमूखी पडलेल्या भक्ताचे नाव आहे. रविवारी पहाटे खोपोली ते चौक दरम्यान ही घटना घडली.
जैन साध्वी सोबत चार ते पाच जणांचा समुह चालत खोपोली येथून चौकच्या दिशेने जात होता. यावेळी मागून आलेल्या भरधाव रिक्षाने मीत जैन याला जोरदार धडक दिली. यात मीत गंभीर जखमी झाला. त्याला चौक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
आणखी वाचा-साताऱ्यात क्षयरुग्ण सर्वेक्षणासाठी १६० पथके
या घटनेची माहिती मिळताच, खोपोलीतील जैन समाज बांधवांनी ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली आहे. खालापूर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे.