शहरात नवीन तुळजापूर नाक्याजवळ दगडखाणीतील पाण्यात बुडून दोघा तरुणांचा मृत्यू झाला. पाण्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे तरुण मृत्युमुखी पडले.
प्रदीप कृष्णा कांबळे (२०, रा. शास्त्रीनगर) व त्याचा मित्र अभिजित गायधनकर (१८) अशी मृतांची नावे आहेत. दुपारी उन्हाची तीव्रता असताना हे दोघे नवीन तुळजापूर नाक्याजवळील दगडखाणीतील पाण्याच्या डबक्यात पोहण्यासाठी गेले होते. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे प्रदीप व अभिजित दोघेही पाण्यात बुडाले. तेव्हा आसपासच्या तरुणांनी पाण्यात उडय़ा मारून दोघा तरुणांना शोधण्याचा प्रयत्न केला असता प्रदीप याचा मृतदेह सापडला. तर अभिजित याचा शोध घेतला असता उशिरा त्याचा मृतदेह हाती लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा