सांगली : प्रस्तावित शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी गुरूवारी शासनाच्या अधिसूचनेची होळी करण्यात आली. यापुढे  शक्तीपीठ बाधित शेतकर्‍यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.सांगलीतील कष्टकर्‍यांची दौलत कार्यालयात शक्तीपीठ बाधित गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी शक्तीपीठ अधिसूचनेची होळी कार्यालयासमोर करून या महामार्गाला तीव्र विरोध करण्यात आला. तसेच दि. १८ जून रोजी कोल्हापूर येथे होणार्‍य  मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा बैठकीत घेण्यात आला. तसेच दि. २७ जुन रोजी जिल्हाधिकारी कचेरी धरणेआंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.  शेतकर्‍यांच्या मुळावर आलेल्या शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालुच ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

बैठकीस उमेश देशमुख, सतीश साखळकर, सुनिल पवार, उमेश एडके, राजेश एडके, विष्णू पाटील,  डॉ. संजय पाटील, किरण राज कांबळे, यशवंत हरगुडे, राजेश एडके  आदींसह सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित १९ गावांतील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision to intensify agitation of shaktipeeth affected farmers to oppose shaktipeeth highway amy
First published on: 13-06-2024 at 19:15 IST