Deepak Kesarkar Confusion Over Maharashtra Chief Minister Post in Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी आज (२६ नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. भारतीय जनता पार्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात १३२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे फडणवीसांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल अशी चर्चा आहे. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व शिवसेनेचे (शिंदे) आमदार मात्र एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा एकदा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवावं अशी मागणी करत आहेत. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी मवाळ भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय भाजपाचे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी घेतील असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. यावेळी केसरकर त्यांच्याबरोबरच होते. राजभवनावरून बाहेर पडल्यानंतर केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणं ही केवळ औपचारिकता आहे. शिंदे यांनी आज त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे”.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Eknath SHinde Ravi Rana
Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”

हे ही वाचा >> आज-उद्या शपथविधी होणार नाही! राष्ट्रवादीने सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी; मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले..

एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर केसरकर काय म्हणाले?

यावेळी केसरकरांना विचारण्यात आलं की मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच चालू आहे का? एकनाथ शिंदे नाराज आहेत का? यावर केसरकर म्हणाले, “एकनाथ शिंदे बिलकूल नाराज नाहीत. शिवसेनेत अजिबात नाराजी नाही. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतल्या भाजपा पक्षश्रेष्ठींना स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की तुम्ही मुख्यमंत्रिपदाबाबत घ्याल तो निर्णय मला व माझ्या पक्षाला मान्य असेल. त्यांनी स्पष्ट शब्दांत पक्षश्रेष्ठींना आपला संदेश दिला आहे. त्यामुळे दिल्लीत चांगला निर्णय होईल असं मला वाटतं”.

हे ही वाचा >> भाजपासमोर शिंदेंची माघार? मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “शिंदेंनी राजीनामा देणं म्हणजे…”

मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकर काय म्हणाले?

दीपक केसरकर म्हणाले, “या राज्याने पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला, युतीला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं आहे. यापूर्वी यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसने या राज्यात २२२ जागा जिंकल्या होत्या. त्यांचा रेकॉर्ड यावेळी आमच्या महायुतीने मोडला आहे. याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. तसेच आता लवकरच या मजबूत महायुतीचा मुख्यमंत्री राज्याला मिळेल. मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत निर्णय होईल. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी चांगला निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.