Deepak Kesarkar Confusion Over Maharashtra Chief Minister Post in Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी आज (२६ नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. भारतीय जनता पार्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात १३२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे फडणवीसांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल अशी चर्चा आहे. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व शिवसेनेचे (शिंदे) आमदार मात्र एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा एकदा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवावं अशी मागणी करत आहेत. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी मवाळ भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय भाजपाचे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी घेतील असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे नाराज? केसरकर म्हणाले, “त्यांनी दिल्लीतल्या वरिष्ठांना स्पष्ट शब्दांत…”
Deepak Kesarkar on Eknath Shinde : महायुतीत सध्या मुख्यमंत्रिपदावरून गोंधळ चालू आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2024 at 16:14 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSएकनाथ शिंदेEknath Shindeदीपक केसरकरDeepak Kesarkarदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमुख्यमंत्रीManmohan Singh
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar answer on is eknath shinde unhappy with mahayuti over maharashtra chief minister post asc