शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या वादातून काल निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरता स्वरुपात गोठवण्याचा निर्णय घेतला. तसेच दोघांनाही शिवसेना हे नाव न वापरण्याचे निर्देश दिले. आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले दीपक केसकर?
“निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. खऱ्या अर्थाने धनुष्यबाण चिन्हावर आमचाच अधिकार आहे. आमच्याबरोर आमदार खासदार जिल्हाप्रमुख, नगरसेवक आहेत. आज धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने दुख झाल्याचे जे सांगतात, तेच या निर्णयाला जबाबदार आहेत. आम्ही वेळेवर कागदपत्रे दाखल केले असताना त्यांनी वेळोवेळी तारखा मागितल्या आहेत. त्यामुळेच आयोगाने हा निर्णय दिला”, अशी प्रतिक्रिया केसकर यांनी दिली आहे.
हेही वाचा – विश्लेषण : शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगानं का गोठवलं?
“प्रत्येकवेळी तारखा मागायच्या, कागदपत्र सादर करायचे नाही, वरून निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं तर आम्हाला जबाबदार धरायचं, हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत लोकांची सहानुभूती कशी मिळेल, याकडे त्यांचे लक्ष आहे. त्यांनी जाणीवपूर्वक आयोगात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही”, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. “आमच्याकडे जे बहूमत आहे. त्यानुसार आम्ही आोगाकडे ‘धनुष्यबाण’ चिन्हाची मागणी करणार आहे. आमची बाजू खरी आहे. त्यामुळे हे चिन्हा आम्हालाच मिळेल ”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. मात्र, आज ज्याप्रकारे आयोगाबाबत ट्वीट केलं जात आहे, ते योग्य नाही. भारतात लोकशाही आहे आणि ती शाबूत ठेवण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. आमच्या विरोधात निकाल दिला, तर ती संस्था चुकीची ही भूमिका घेणं चुकीचं आहे. हे लोकशाहीला घातक आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल…उद्धवसेनेकडून चिन्हांची चाचपणी सुरू
“निवडणूक आयोगाने असा निर्णय पहिल्यांदाच घेतला असे नाही. यापूर्वी तामिळनाडूमध्येही जयललिता आणि पनिरसेल्वम यांच्या बाबतीत घेतला होता. आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, त्यामुळे आमचं धनुष्यबाणावर प्रेम आहे. मात्र, लोकांची सहानुभूती मिळवायची, निवडणुका जिंकायच्या, विचारधारेपासून दूर जायचे, हा प्रकार सध्या सुरू आहे”, असेही ते म्हणाले.