सोलापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वर्षानुवर्षे मुस्लीम समाजाचा वापर केवळ मतांच्या राजकारणासाठी केला आहे. तर याउलट, राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव जपणारे आहे, असा दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला.

करमाळा येथे मुस्लीम समाजाने आयोजिलेल्या कार्यक्रमात केसरकर बोलत होते. शालेय शिक्षण,विभागाने करमाळा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या नामदेवराव जगताप उर्दू शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गांना मंजुरी दिली आहे. त्याचे औचित्य साधून केसरकर यांचा करमाळा मुस्लीम समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, करमाळा मुस्लीम समाजाचे अध्यक्ष उस्मान तांबोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
mahayuti , Municipal Elections, leaders MNS ,
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत सामील व्हा, मनसेच्या बैठकीत प्रमुख नेते मंडळींचा सूर
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन

केसरकर म्हणाले, कोणताही धर्म जातीभेद, हिंसा शिकवत नाही, तर मानवता, अहिंसा, लोककल्याण, शांतता, बंधुभाव, सद्भावना यांची शिकवण देतो. स्वातंत्र्य लढ्यानंतर भारत-पाकिस्तान फाळणी झाली. पाकिस्तान धर्माच्या नावाने निर्माण झाले. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उभे राहिले. आज पाकिस्तानाची प्रचंड अधोगती झाली असताना भारताची ताकद जगभरात दिसून येत आहे. भारतात हिंदू-मुस्लीम समाज गुण्यागोविंद्याने राहतात. एकनाथ शिंदे सरकार सर्वधर्मसमभाव जपणारे आणि हिंदू-मुस्लिमांसह सर्वा समाज घटकांना समान न्याय देणारे आहे. दोन्ही काँग्रेसच्या मतपेटीच्या राजकारणापासून मुस्लीम समाजाने सावध होऊन शिंदे सरकारला साथ द्यावी, असे आवाहन केसरकर यांनी केले.

Story img Loader