Deepak Kesarkar Replied To Uddhav Thackeray : रिक्षावाल्यांना हिणवण्यामध्ये आणि रिक्षावांल्याचे दुख समजून घेण्यामध्ये फरक असतो, असा खोचक टोला शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. हा फरक लवकरच महाराष्ट्राच्या जनेतला जाणवेल, असेही ते म्हणाले.
महिला आघाडीची बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता’, असा टोला एकनाथ शिंदें यांना लगावला होता. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला दिपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दिपक केसरकर म्हणाले, ”मी काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत होतो. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्याकडे बसस्टॅंड असतात. बसमधून प्रवाशी उतरला की तो रिक्षात बसून तो आपल्या घरी जातो. दोघेही एकमेकांशी जुडलेले आहेत. प्रवाशी आगारातून किंवा बसमधून बाहेर येतो. मात्र, रिक्षेवाले बाहेर उन्हात उभे असतात. त्यांच्यासाठी काही करता येईल का यावर विचार सुरू आहे. यावरून रिक्षावाला कसा विचार करतो, हे समजेल. रिक्षावाल्यांना हिणवण्यामध्ये आणि रिक्षावांल्याचे दुख समजून घेण्यामध्ये हाच फरक असतो”
ते पुढे म्हणाले, ”कोणत्याही मुख्यमंत्री कार्यालयात आमदारांसाठी एक राखीव कॅबिन असते. त्याचं कॅबिनमध्ये जाऊन आज आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो आहे. याचा आम्हाला आनंद आहे. खूप वर्षांनी आम्ही या कॅबिनमध्ये जातो आहेत.”