मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे अकार्यक्षम होते असा आरोप शिंदे गटाकडून केला जात नसल्याचा खुलासा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निर्णयांचा धडाका सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काळामध्ये निर्णय रखडून पडल्याचा आरोप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर केसरकारांनी उद्धव ठाकरे हे कार्यक्षम मुख्यमंत्री होते मात्र सोबतच्या मित्रपक्षांकडे असणाऱ्या खात्यांमुळे काम रखडल्याचा आरोप केलाय.
नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी
“अडीच वर्षांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवलं जात आहे. काल अबदुल सत्तार असतील किंवा आज तुम्ही असाल असं सांगताना दिसताय की आताचे मुख्यमंत्री वेगाने, धडाडीने निर्णय घेत आहेत. लोकांच्या हिताची कामं अडीच वर्षांपासून अडकून पडलेली असं सांगितलं जात आहे. नेमकं अकार्यक्षम कोण आहे?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना केसरकरांनी करोना काळात मोदींप्रमाणेच उद्धव ठाकरेंनी आधी करोनाविरुद्धच्या लढाईला प्राधान्य देत चांगला मुख्यमंत्री असल्याचं दाखवून दिल्याचं सांगितलं. मात्र त्याच वेळेस त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांमुळे कारभार रखडल्याचा आरोप केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा