महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून (८ एप्रिल) दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची राज्य सरकार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे या अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये अयोध्येतील महाराष्ट्र भवनाबद्दल सकारात्मक चर्चा होईल.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, अयोध्येत जे मराठी बांधव जातील, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी तिथे मोठं महाराष्ट्र भवन बांधण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. तसेच अयोध्या दौऱ्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटतील. दोघांमध्ये सकारात्मक चर्चा होईल.

Aditya Thackeray eknath shinde
Aditya Thackeray : “शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण…”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी ‘मातोश्री’वर काय घडलं
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून होत आहे. याबद्दल दीपक केसरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगूनही ते आले नाहीत, उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिलेलं वचन मोडलं याचा मी साक्षीदार. दोन्ही पक्षांमध्ये (शिवसेना आणि भाजपा) काही जुळवायचं असेल तर ते केवळ उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.

हे ही वाचा >> व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे वर्क फ्रॉम होमचं अमिष, भामट्यांनी महिलेला घातला लाखोंचा ‘ऑनलाईन’ गंडा!

उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री राज्यात आहेत : केसरकर

केसरकर म्हणाले की, मागे एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद दिला होता. पण त्यांनी ऐकलं नाही. एकनाथ शिंदे सध्या राज्यात चांगलं काम करत आहेत. मुळात उद्धव ठाकरे यांनी ठरवलं होतं की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं. परंतु त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर मुख्यमंत्री होण्यासाठी दबाव टाकला, असं उद्धव साहेबांनी सांगितलं. अन्यथा आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असते. त्यामुळे राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री राज्यात आहेत. त्यामुळे त्यांना शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं फारसं वाईट वाटलं नसेल.