सिंधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त झाला आहे. त्यामुळे नकारात्मकता सोडून राजकीय मतभेद विसरून “सकारात्मक” विचारांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करू. जिल्ह्याचा न झालेला विकास हाच आमचा शत्रू आहे, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. तसेच यापुढे भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यापुढे सगळ्या निवडणूका लढवणार का याबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, असे वक्तव्यही केसकरांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
हेही वाचा- “सर्वांना वाटतं हे सरकार थोडं आधीच यायला हवं होतं, पण…”, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
सिंधुदुर्गात सीसीटिव्ही कॅमेरा लावणार
आगामी निवडणुका ह्या शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच लढवण्यात येतील. त्याचा “फॉर्मुला ” वरिष्ठ स्तरावर ठरेल, त्याप्रमाणे पुढील भूमिका घेऊ असेही केसरकर म्हणाले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. जेणेकरून चोऱ्यांचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य होईल.
हेही वाचा- पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…
जिल्ह्याचा न झालेला विकास हाच माझा शत्रू
तर सिधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त झाला आहे. त्यामुळे जुने विरोध पुन्हा-पुन्हा न काढता पुढील राजकारण विकासाच्या दृष्टीने केले जाईल. जिल्ह्याचा न झालेला विकास हाच माझा आता शत्रू आहे, असेही मत केसकरींनी व्यक्त केले.