कर्जतचे चित्रकार दीपक पाटील यांची ‘मास्टर पेंटर्स ऑफ द वल्र्ड’ म्हणून निवड झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मास्टर पेंटर्स ऑफ द वर्ल्ड’ म्हणून निवड होणारे ते दुसरे भारतीय चित्रकार ठरले आहेत.
इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिन हे मासिक अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून प्रकाशित होते. जगभरातील सवरेत्कृष्ट चित्रकारांचे मासिक म्हणून हे ओळखले जाते. या मासिकात ‘मास्टर पेंटर्स ऑफ द वल्र्ड’ या मालिकेत जगभरातील विविध रंग माध्यमात काम करणाऱ्या चित्रकारांची ‘मास्टर पेंटर’ म्हणून निवड केली जाते. या ‘मास्टर पेंटर्स’ची कार्यपद्धती जगभरातील चित्रकारांना मार्गदर्शक ठरावी म्हणून त्यांच्याकडून सर्वोत्तम कामाविषयी लेख मागवले जातात. ते लेख मासिकात प्रसिद्ध केले जातात. या लेख मालिकेत ‘मास्टर पेंटर’ म्हणून सहभागी होण्याचा मान कर्जतचे चित्रकार दीपक पाटील यांना मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा