शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा खळबळजनक दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन भाऊसाहेब शिंदे यांनी हे गंभीर आरोप केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात मी दीपाली सय्यदचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे अनेक पुरावे प्रशासनाला दिले आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मी तुम्हाला दीपाली सय्यद यांच्या बँक खात्यांचा तपशील दिला आहे. २०१९ मध्ये दिपाली सय्यद यांना पाकिस्तानचा नकली पासपोर्ट देण्यात आला. त्या पासपोर्टची प्रतही मी तुम्हाला दिली. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचं राष्ट्रीयत्व स्वीकारलं आहे. पाकिस्तानात त्यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा दावा शिंदे यांनी केला.

kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Suspect related to Babbar Khalsa arrested from Mumbai NIA takes action
बब्बर खालसाशी संबंधित संशयीताला मुंबईतून अटक, एनआयएची कारवाई
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?
Badlapur sexual assault case, akshay shinde parents,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
reshma shinde reveals husband pavan
“मी अभिनेत्री आहे हे पवनला माहिती नव्हतं…”, साऊथ इंडियन सासरी मराठी मालिका पाहतात का? रेश्मा शिंदे म्हणाली…

दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी आणि त्याच्या बायकोशी संबध आहेत. तसेच लंडन, दुबई येथे त्यांची मालमत्ता आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला.

“आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला गोळ्या घालून मारू… ज्या बाईचे पाकिस्तानशी संबंध आहेत. त्या अनेकदा पाकिस्तानात जातात, कराचीत राहतात. त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी आणि त्याच्या बायकोशी संबंध आहेत. आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला भरदिवसा गोळ्या घालतो. आम्ही तुरुंगात जायलाही तयार आहोत,” असंही भाऊसाहेब शिंदे म्हणाले.

Story img Loader