शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिलीय. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी जशी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, तशी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी, अशी मागणी दीपाली सय्यद यांनी केली. अशी मुलाखत घेतली तरच एकत्र येऊन यावर काही तरी मध्यस्थीचा मार्ग निघेल, असंही सय्यद यांनी नमूद केलं. त्या मंगळवारी (२६ जुलै) दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपाली सय्यद म्हणाल्या, “आजची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहिली. यानंतर मी संजय राऊत यांना एवढंच सांगेल की त्यांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी. त्यांनी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेऊन त्यांच्या मनातील गोष्टी बाहेर आणल्या, तशीच मुलाखत एकनाथ शिंदेंची घ्यावी. तसं झालं तर एकत्र येऊन काही तरी मध्यस्थीचा मार्ग निघेल.”

“मी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार”

“महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्याच स्तरावर गेलंय हे सर्वांनाच माहिती आहे. मी शिवसेनेची कार्यकर्ता, नेता आहे. त्यामुळे यात मध्यस्थी होऊन पुन्हा आमचं घर एकत्र उभं राहावं. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आजही मी दिल्लीत आहे आणि अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. यात काही शिवसेनेचे नेते आहेत, तर काही भाजपाचे नेते आहेत. सगळ्यांना भेटत आहे, लवकरच काहीना काही निर्णय होईल,” अशी आशाही दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली.

कोणत्या भाजपा नेत्यांना भेटत आहात या प्रश्नावर दीपाली सय्यद म्हणाल्या, “भाजपाचे जे नेते भेटतील त्यांना भेटणार आहे. देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे.”

पाहा व्हिडीओ –

अमित शाहांची भेट घेणार आहात का? दीपाली सय्यद म्हणाल्या…

अमित शाहांना भेटणार का या प्रश्नावर दीपाली सय्यद म्हणाल्या, “अमित शाहांची देखील भेट घेणार आहे. कारण त्यांच्याशिवाय काहीच हालत नाही. तिथेच जाऊन चर्चा अडकते. प्रत्येकवेळी त्यांनीच सुरुवात केली आहे. काही वर्षांपूर्वी आधी राजकारण पलटलं होतं तेव्हाही त्यांचाच हात होता. आताही जेव्हा राजकारण पलटलं आहे तेव्हाही त्यांचाच यात मोठा हात आहे. त्यामुळे मला वाटतं सर्वात आधी त्यांना भेटलं पाहिजे.”

हेही वाचा : शिंदे गटात येण्यासाठी ईडीचा दबाव आहे का? अर्जुन खोतकर म्हणाले, “माझ्या चेहऱ्यावर तोच ताण…”

“मनात असेल तर नाती कितीही फाटली तरी ती पुन्हा व्यवस्थित करता येतात. मला वाटतं कुठंतरी काहीतरी नक्की मार्ग निघेल. कुणीही मी बाळासाहेबांना माझा देव मानत नाही, मी शिवसैनिक नाही असं म्हणत नाही. मग कुठे आडतंय, का कुणी पुढाकार घेत नाही? का एकत्र येण्याचा प्रयत्न केला जात नाही. प्रत्येकजण माध्यमांमधून येतंय आणि समोरचे किती वाईट आहे, कसा धोका दिला हे सांगत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepali sayyad comment on uddhav thackeray interview by sanjay raut pbs
Show comments