आपण निवडणूक लढवू नये यासाठी आपल्याविरुद्ध जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, असे सांगताना नगर मतदारसंघातील ‘आम आदमी पक्षा’च्या उमेदवार व अभिनेत्री दीपाली सय्यद यांना पत्रकार परिषदेतच रडू कोसळले. मी जिंकण्यासाठीच निवडणुकीत उतरले आहे. माझी लढाई सत्यासाठी व उमेदवारी भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, असे त्या म्हणाल्या.
आपण यापूर्वी राजकारणाबद्दल केवळ ऐकून होतो, परंतु आता मतदारसंघात फिरताना त्याचा जवळून अनुभव घेत आहोत. गेल्या वीस दिवसांत संपूर्ण मतदारसंघात फिरले, लोकांचे प्रश्न समजून घेतले. मी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून अफवा पसरवल्या जात आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते, कोतवाली पोलीस ठाण्यात त्यातूनच गुन्हा दाखल करण्यात आला. मला पळवून नेण्यात आले, केवळ मुस्लिम मते खाण्यासाठीच मी उभी आहे, अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepali syed cried in press conference