लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : मोदी ही ईस्ट इंडिया कंपनी आहे, या कंपनीला हाकलून देण्याची सुरूवात सांगलीतून करायची आहे. त्यासाठी मविआने चंद्रहार पाटील यांच्यासारख्या मल्लाला मैदानात उतरविले आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगलीत प्रचार सभेवेळी केले.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Sanjay Malhotra loksatta article
अन्वयार्थ : कपातपर्वाचा पायरव?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उबाठा शिवसेनेचे पैलवान पाटील यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करत स्टेशन चौकापासून मारूती चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. मारूती चौकामध्ये या रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. अरूण लाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-सांगली : खासदारांच्या संपत्तीत २९ कोटींची वृध्दी

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, मविआमध्ये उमेदवारीसाठी असलेला संघर्ष संपला असून काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळण्याचा शब्द दिला आहे. याबद्दल आमदार पाटील, डॉ. विश्‍वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत यांचे मी आभार मानतो. विशाल पाटील हेही आमचेच आहेत. ते माघार घेतील असा विश्‍वास वाटतो. उमेदवारी माघारीच्या मुदतीपर्यंत त्यांची समजूत काढली जाईल. यामुळे सांगलीत एकास एक लढत होणार हे स्पष्ट आहे. सांगलीच्या खासदारांना तडीपारीची नोटीस सांगलीकर देतील असा विश्‍वास वाटतो.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष फोडण्याचे पाप भाजपने केले आहे. याचे उत्तर या निवडणुकीत मतदार देतीलच. उध्दव ठाकरे यांचा पक्ष फोडून भाजपचे पोट भरले नाही, म्हणून आमचा पक्षही फोडला. सांगलीच्या उमेदवारीवरून सर्वांचा रोख माझ्यावर होता, मात्र हा उध्दव ठाकरे आणि काँग्रेसचा विषय आहे. यात माझा काहीच संबंध नाही. एकाच एक लढत झाली तर आजच निकाल लागला आहे असे समजा.

आणखी वाचा-शरद पवारांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “तुतारीसमोरचं बटण दाबा, कसं दाबायचं ते काल कुणीतरी…”

दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सकाळी खासदार राऊत यांची भेट घेउन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यानंतर पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाने आपण आघाडी धर्म पालन करत असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

Story img Loader