सांगली : तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे खासदार संजयकाका पॅनेलचा पराभव करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता कायम राखली आहे. रविवारी तासगाव व आटपाडी बाजार समितीसाठी चुरशीने मतदान झाले. आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पॅनेलच्या एका ग्रामपंचायत सदस्याला कानशिलात लगावल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात राखली‌.

खा. पाटील यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत चुरशीने ९७ टक्के मतदान झाले, तर आटपाडीमध्ये ९७.११ टक्के मतदान झाले. तासगावमध्ये भाजपाने कॉंग्रेससोबत केलेल्या पॅनेल विरुद्ध राष्ट्रवादी आणि आटपाडीमध्ये भाजपा-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शिंदे गट- काँग्रेस-रासप अशी लढत झाली.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

हेही वाचा – पालघर : वसई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बविआचे निर्विवाद वर्चस्व; १७ पैकी १६ जागांवर विजय

तासगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने १८ पैकी १४ जागा जिंकून सत्ता कायम राखली असली तरी, खा. पाटील यांच्या पॅनेलने चार जागा जिंकून बाजार समितीमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील हेही विरोधी पॅनेलमधून विजयी झाले. आटपाडी बाजार समितीसाठी भाजपाने राष्ट्रवादीशी आघाडी केली होती, तर विरोधी  पॅनेलमध्ये शिवसेना शिंदे गट, रासप आणि काँग्रेस यांचे संयुक्त पॅनेल मैदानात होते. या बाजार समितीसाठी सुमारे ९७.११ टक्के मतदान झाले. मतदानावेळी काळेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांना आ. पडळकर यांनी कानशिलात मारल्याचा आरोप केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा – “२०२४ ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार”, जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवारांचं नऊ शब्दांत उत्तर, म्हणाले…

मतदारांना आवाहन करण्यासाठी भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर, माजी आ. राजेंद्र देशमुख राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील हे उपस्थित होते. मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आटपाडीमध्ये दोन्ही पॅनेल बरोबरीत
भाजप – राष्ट्रवादी – ९
शिवसेना शिंदे गट – रासप – कॉंग्रेस – ९

Story img Loader