दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना जगण्याचा अधिकार नसल्याचे परखड प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शनिवारी येथे केले, त्या एका उपग्रह वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या. या घटनेची गणना दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरणाशी होत असल्याने या क्रूरकम्र्याना जगण्याचा काहीएक अधिकार नाही, असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले. बलात्काऱ्यांना सरसकट फाशीची शिक्षा ठोठवावी की नाही, याबाबत संसद आणि कायदेपंडितांनी विचारविनिमय करावा, अशा घटना टाळण्यासाठी समाजाची व प्रामुख्याने पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
बलात्काऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना जगण्याचा अधिकार नसल्याचे परखड प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शनिवारी येथे केले, त्या एका उपग्रह वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या.
First published on: 31-12-2012 at 01:08 IST
TOPICSप्रतिभा पाटील
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi gang rape culprits have no right to live pratibha patil