Sanjay Raut on Eknath Shinde : राज्यात महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालेलं असतानाही मुख्यमंत्री पदाचं घोंगडं अद्यापही भिजत आहे. सत्तास्थापनेची तारीख ठरलेली असली तरीही मंत्रिमंडळातील खातेवाटपावर चर्चा झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द होत असल्याने चर्चा पुढे सरकत नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र, यावरून संजय राऊतांना वेगळाच संशय आला आहे. दिल्लीतील महाशक्ती एकनाथ शिंदेंच्या पाठिशी असल्याने एकनाथ शिंदे भाजपाला डोळे वटारून रुसवे फुगवे करू शकत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची काळजी भाजपाला वाटत नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे. हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत. ज्यांनी मतदान केलंय, त्यांचा आपण केलेल्या मतदानावर किंवा निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. लोक शंका घेत आहेत. यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे. आज मारकडवाडीत १४४ कलम लावलाय. लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. अजून राज्यात सरकार यायचंय. त्या मतदारसंघातून भाजपाचा पराभव झालाय. पण मतदारांना वाटतंय विजयी उमेदवाराला जी मते मिळाली आहेत ती कमी मते आहेत. जिंकून सुद्धा फेरमतदान घेत आहेत, कारण कमी मतदान झालंय”, असं संजय राऊत म्हणाले.

Can EVM be hacked_ S Chockalingam Answer
ईव्हीएम हॅक करता येतं का? विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने सांगितली मतमोजणीपर्यंतची सगळी प्रक्रिया
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Gazetted Civil Services Joint Prelims Exam-2024
परीक्षा MPSC ची, प्रश्न दारूचा; परीक्षेत विचारलं, “दारूला नाही कसं म्हणाल?”
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Rabi sowing in the country is on 428 lakh hectares
देशातील रब्बी पेरण्या ४२८ लाख हेक्टरवर; जाणून घ्या, देशभरातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र
Ajit Pawar meeting with Amit Shah
Ajit Pawar: शिंदेंची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर? अजित पवारांचा दिल्ली दौरा, ‘या’ खात्यावर केला दावा
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”

हेही वाचा >> Sanjay Raut : “एका गृहमंत्री पदावरून सरकार अडलेलं नाही, तर…”, महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

एकनाथ शिंदेंच्या मागे महाशक्तीचा पाठिंबा

एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलंय, याबाबत आज संजय राऊतांना विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “या देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यामागे जे रुसवे फुगवे सुरू आहेत, मला वाटतं दिल्लीतील महाशक्ती कार्यक्रम करत आहे. दिल्लीतील एखाद्या महाशक्तीशिवाय एकनाथ शिंदे अशाप्रकारचं धाडस करू शकत नाही. कारण कोणाची हिंमत नाहीय सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांविरोधात अशाप्रकारे रुसवे फुगवे करण्याची.”

दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करतंय

“तीन वर्षांपूर्वी ईडी, सीबीआय, दिल्लीतील गृहमंत्रालयाला घाबरून शिवसेना फोडून पळून गेले. त्यांना तीन वर्षांत असं कोणतं टॉनिक मिळालं की ते दिल्लीला डोळे दाखवून रुसवे फुगवे करून बसलेत. दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात हा खेळ करतंय आणि हा भाजपातील अंतर्गत खेळ आहे”, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलंय.

ते पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या मागे शक्तीमोचक वगैरे कोणी नाहीय. कोणी काही फसलं नाहीय. दिल्लीच्या सूचनेनुसार डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. दिल्लीतून डमरू हलतोय. दिल्लीतील महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय एकनाथ शिंदे असा डाव करू शकत नाहीत.”