श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी वसईत तपास केला. शनिवारी पोलिसांनी श्रध्दाचे मित्र आणि सहकारी अशा ४ जणांचे जबाब नोंदवले. श्रध्दाला २०२० मध्ये आफताबने केलेल्या मारहाणीसंदर्भातही चौकशी करण्यात आली.

हेही वाचा- भारत जोडो यात्रेमध्ये हे काय घडलं? शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहताना वाजले फटाके, राहुल गांधी संतापले

we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
cid aahat serials in marathi
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकांचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…

वसईतील तरुणी श्रध्दा वालकर हिच्या हत्ये प्रकऱणी दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी वसईत दाखल झाले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांनी विविध ठिकाणी चौकशी करून तपास सुरू केला आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांनी श्रध्दाचा मित्र गॉडविन राॅड्रीग्ज, राहुल राॅय, शिवानी म्हात्रे तसेच श्रध्दा मुंबईत ज्या कॉल सेंटर मध्ये काम करायची तेथील व्यवस्थापक करण बहरी यांची चौकशी करून जबाब नोंदवला. आफताब याला अमली पदार्थांचे व्यसन असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

हेही वाचा- “…तर माझा कार्यक्रम आटोपला असता” श्रद्धांजली वाहावी लागली असती म्हणत गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

श्रध्दा आणि आफताब २०२० मध्ये वसईच्या रिगल अपार्टमेंट मध्ये भाड्याचा सदनिकेत रहात होते. या काळात आफताब दिला मारहाण करत होता. डिसेंबर महिन्यात त्याने श्रध्दाला बेदम मारहाण केली. श्रध्दाचा मित्र गॉडविन रॉड्रीक्स आणि राहुल राय याच्या मदतीने ती वसईच्या एव्हरशाईन येथील ओझॉन रुग्णालयात दाखल झाली होती. या मारहाणीत तिच्या चेहर्‍यावर, मानेवर आणि पाठीवर जखमा झाल्या होत्या. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने तुळींज पोलीस ठाण्यात आफताबच्या विरोधात दिलेला अर्ज तुळींज पोलिसांनी सापडला असून तो दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. त्यात तिने आफताबने मारहाण केल्याचे सांगून तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. पण श्रद्धाने ही तक्रार आठ दिवसांनी परत घेतली असल्यामुळे तपासी अंमलदाराने दोघांचे जबाब नोंदवत तक्रार निकाली काढली होती.