सांगली : औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवून त्याच्या नावाने भरणाऱ्या उरसावर ताबडतोब बंदी घाला, या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने ११ मार्च रोजी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा अनन्वित अत्याचार व छळ करून हत्या करणारा क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचे रूपांतर दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचे रूपांतर मशिदीमध्ये करण्यात आलेले आहे. मजार मोगल सम्राट शहनशा हजरत औरंगजेब आलमगीर या नावाने बेकायदेशीर उभारलेल्या दर्ग्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात उरूस भरवला जातो. या उरसाच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना व शाळांना सुटी दिली जाते. यासर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणारे आहेत. या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या विरोधात मंगळवार दि. ११ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तारखेप्रमाणे येणारा बलिदान दिवस याच दिवशी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवा या मागणीसाठी निदर्शने करण्यात येणार आहे.

क्रूरकर्मा औरंगजेब यांचे उदात्तीकरण थांबवावे यासाठी शिवभक्त आणि राष्ट्रभक्त यांनी सामील व्हावं, असे आवाहन हिंदू एकता आंदोलनचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील, दत्तात्रय भोकरे, शहर अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे आदींनी केले आहे.

Story img Loader