‘आदर्श’ गैरव्यवहारप्रकरणी नेमलेल्या आयोगाचा चौकशी अहवाल आणि त्यावरील कृती अहवाल जाहीर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे. हा अहवाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
हा चौकशी अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी सादर होऊनही कृती अहवालासह सादर करण्याचे कारण देत तो विधिमंडळास सादर करण्यात आलेला नव्हता. आता तो तयार असल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand of assembly session for adarsh discussion