वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य हैराण असताना त्यात राज्य परिवहन महामंडळाने भाडेवाढ करून तेल ओतले आहे. बस भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांना प्रवास करणेही डोईजड होणार असल्याने भाडेवाढ रद्द करण्याची मागणी बहुजन स्वराज महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वीच वातानुकूलित बस सेवेच्या प्रवास भाडय़ात १२ टक्के, तर साध्या बससेवेत सहा टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. त्या दणक्यातून प्रवासी सावरत नाही तोच पुन्हा भाडेवाढ केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बस भाडेवाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांनाच बसत असून उच्चवर्ग बसने प्रवास करीत नसल्याने त्यांना बस भाडेवाढीशी काहीही देणेघेणे नसते. सर्वसामान्यांसाठी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद नाथेकर, शेख रफिक साबीर, सुभाष चव्हाण, भरत कटारिया आदींची स्वाक्षरी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand rises to take back st bus fare rise