येळ्ळूर येथे मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ सोमवारी शेकापच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी कर्नाटक शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या आठवडय़ात बेळगावजवळील येळ्ळूर गावातील मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता. सीमाप्रश्नासाठी लढणाऱ्या मराठी बांधवांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाल्याने त्याचे पडसाद दिसू लागले आहे. या अंतर्गत आज शेकापने शिवाजी चौकात निदर्शने करीत कर्नाटक शासन व पोलिसांचा निषेध नोंदवला.   
सीमाभागात मराठी बांधवावर सातत्याने अत्याचार होत असतानाही महाराष्ट्र शासन गप्प का आहे, असा सवाल सुनील सरनाईक यांनी आंदोलना वेळी उपस्थित केला. कर्नाटक पोलिसांनी मराठी बांधवांना केलेल्या अमानुष मारहाणीचे पुरावे महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर करून सीमाप्रश्न तातडीने मिटवावा, अशी मागणी त्यांनी केली. कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, स्वाभिमानी मराठी बांधवांचा विजय असो या घोषणांनी परिसर दुमदुमला. या वेळी एन.डी. लाड, सुभाष सावंत, सुभाष बोरगे, संभाजी जगदाळे, रामचंद्र उबाळे, मनीषा माणगावकर, महादेव पाटील, भाऊ सुतार, यशवंत पाटील यासह कार्यकत्रे सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा