जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीने पाय पसरले असून, आता औंढा नागनाथ तालुक्यातील काकडदाभ्यात बाधा झालेल्या ७ रुग्णांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. दरम्यान, काकडदाभ्याला शुक्रवारी आरोग्य पथक रवाना झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी आरोग्य सहायक संचालकांनी िपपळदरी, औंढा, वसमत येथे भेटी देऊन साथीवर नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वसमत, िपपळदरी, औंढा नागनाथ येथील डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू असतानाच औंढा नागनाथ तालुक्यातील काकडदाभा येथे डेंग्यूचे ७ रुग्ण आढळले. त्यांना नांदेड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. किरण करडिले, प्रसाद काळे, नंदाबाई करडिले, माणिकराव मुकाडे, संगीता काकडे, शंकर मुरकुटे आदींचा यात समावेश आहे. याच गावातील पांडुरंग सावळे, मारुती मुरकुटे, विलास करडिले, खंडुजी साळवे, भानुदास कोठुळे, राजू सरकटे, शिवाजी करडिले, राणी करडिले, ऋतुजा साळवे, रामेश्वर मुरकुटे, मधुबाई मुरकुटे, रूपाजी काळे, पांडुरंग काळे, अर्चना जवादे आदींसह तीन महिन्यांचे बालक ऋतुराज दुमने यांच्या अंगात ताप असून, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. गावात तापीचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून आसले, तरी गावात सुरू केलेले धूर फवारणीचे काम अध्र्यावरच सोडले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता काकडदाभ्यात तापीचे रुग्ण असल्याची कबुली त्यांनी दिली. गावात तत्काळ आरोग्य पथक पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मलेरिया विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय देशपांडे (औरंगाबाद) यांनी वसमत, िपपळदरी, औंढा नागनाथसह काही गावांना भेटी देऊन पाहणी केल्याची माहिती त्यांनी दिली.
सहायक आरोग्य संचालकांनी आरोग्य विभागास डेंग्यूची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने प्रत्येक घरी जाऊन अळीसाठी प्रतिबंधक अॅबेट पाण्यात टाकणे, तसेच तुंबलेल्या नाल्या वाहत्या करणे, पाण्याची गटारे साचू नयेत याची काळजी घेणे, साफ-सफाईकडे विशेष लक्ष देण्यासंबंधी ग्रामपंचायत व नगरपालिकांना पत्राद्वारे सूचना केल्याची माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली.
डेंग्यूची साथ थांबता थांबेना; हिंगोलीत ७ रुग्ण अत्यवस्थ वार्ताहर, िहगोली
जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीने पाय पसरले असून, आता औंढा नागनाथ तालुक्यातील काकडदाभ्यात बाधा झालेल्या ७ रुग्णांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
First published on: 13-09-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue 7 patient serious