जिंतूर येथे डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. जालना रस्त्यावरील दीपाली शिवकुमार घुगे (वय २२) या युवतीला डेंग्यूची लागण झाल्याने तिच्यावर औरंगाबादला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
गेल्या १० दिवसांपासून दीपाली घुगे तापाने आजारी होती. तिच्यावर जिंतुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र ताप वाढत चालला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शुक्रवारी तिची तपासणी केली असता तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तातडीने दीपालीला तिच्या पालकांनी औरंगाबादला हलवले. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिंतूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तापाने त्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिकेकडून धूरफवारणी केली जात नसल्यामुळे डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे. पालिकेकडील धूरफवारणी यंत्र पडून आहे. जिंतूर ग्रामीण रुग्णालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सततच्या गरहजेरीमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. जिंतुरात तापाची साथ पसरली असताना पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
पूर्णा तालुक्यातही तापाची लागण
पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजदापूर गावातील अनेकांना डेंग्यूसदृश तापाच्या आजाराची लागण झाली असून गावकरी हैराण झाले आहेत. मळमळ होणे, डोके दुखणे व ताप येण्याचे प्रकार सुरू असताना रुग्णांना कंठेश्वरच्या दवाखान्यात अधिकारी, कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांना पूर्णेतील खासगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. आजदापूर गावात जवळपास ७० ते ८० लोक तापाने आजारी असताना आरोग्य विभाग मात्र शांत आहे.
कंठेश्वर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या सततच्या गरहजेरीचा फटका रुग्णांना बसत आहे. डॉ. भायेकर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना पशाची मागणी करतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला. डॉ. भायेकर यांची रुग्णांशी अरेरावी व पसे मागण्याची वृत्ती वाढल्याचे आरोप यामुळे त्यांची इतरत्र बदली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्याकडे केली आहे. रमेश ठाकूर, सुभाषराव कदम, व्यंकटराव कदम, वैजनाथ ठाकूर, दत्ता ठाकूर, उद्धव कदम, प्रभाकर ठाकूर यांच्यासह कंठेश्वर, सातेगाव, सारंगी, धनगर टाकळी, आजदापूर येथील ग्रामस्थांनी ही तक्रार केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा