Devendra Fadnavis & Raj Thackeray Meet : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शिंदे गट आणि भाजपा यांच्यात मंत्रीपदांचं वाटप नेमकं कसं होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असल्यामुळे अद्याप मंत्रीमंडळ विस्तार अधांतरीच राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शक्यता वर्तवल्या जात असताना भाजपाने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली होती. ही शक्यता राज ठाकरेंनी फेटाळून लावली असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रामुळे चर्चांना उधाण!

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र त्यांना पाठवलं होतं. या पत्रामध्ये “पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन”, अशा शब्दांत फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर पुन्हा एकदा मनसे-भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!

मनसेच्या एकमेव आमदाराची भाजपाला साथ!

तब्बल दीड वर्षांनंतर झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपाचे सर्व आमदार भाजपा उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या पाठिशी उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेगळी भूमिका घेतलेली असताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे नेमके कुणाला मतदान करणार? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, राजू पाटील यांनी भाजपाच्याच उमेदवाराला आपलं मत दिलं. यामुळे देखील भाजपा-मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरेंना मंत्रिपद? राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

राज ठाकरेंवर झाली होती हिप बोन शस्त्रक्रिया!

दरम्यान, गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिपबोन शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपाच्या गोटातून सांगितलं जात आहे. मात्र. सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे या भेटीमध्ये बदलत्या राजकीय समीकरणांवर देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader