जिल्हा परिषद सेवेतील उपलेखापाल पदावर नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या आणि उपलेखापाल पदावर पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची २०१२ वर्षांसाठीची संपूर्ण महाराष्ट्राची विभागीय परीक्षा दिनांक ८ व ९ डिसेंबर २०१२ रोजी सेंट जॉन बाप्टिस्ट हायस्कूल, जांभळी नाका, ठाणे (पश्चिम), जिल्हा ठाणे येथे आयोजित केली आहे.
उपरोक्त परीक्षेची प्रवेशपत्रे संबंधित विभागीय आयुक्तांकडे रवाना केलेली आहेत. ज्या उमेदवारांना परीक्षेची प्रवेशपत्रे प्राप्त होणार नाहीत, त्यांनी त्यांच्या संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांची नोंद घ्यावी, असे विजय नाहटा विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Story img Loader