कराड : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, बारा बुलतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापले. अशाच पद्धतीने सर्वांनी पुढे जाताना तसेच वागायलाही हवे. तरी, पुसेसावळीत चांगल्या सामाजिक वातावरणासाठी सर्वांनी एकमेकांना आधार द्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे गेल्या रविवारी (दि. १०) रात्रीच्या सुमारास प्रार्थनास्थळावरील हल्ला, जाळपोळ आणि मोडतोड होताना, त्यात नूरहसन शिकलगार या अल्पसंख्याक तरुणाचा मृत्यू झाला. दहाजण जखमीही झाले होते. समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे घडलेल्या या हिंसाचारानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात सलग ७२ तास इंटरनेट बंद राहिले. तर, पुसेसावळीत संचारबंदी तर अन्यत्र जमावबंदी राहिल्याच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार पुसेसावळीत अचानक दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा, घटनेची नेमकी माहिती घेताना दंगलीचा बळी ठरलेल्या नूरहसन शिकलगार याच्या घरी जाऊन शिकलगार कुटुंबियांचे सांत्वन केले. नूरहसनचे आई-वडील व पत्नीशी चर्चा केली. या वेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख उपस्थित होते.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
gulabrao deokar loksatta news
शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

हेही वाचा >>>उद्यापासून पुन्हा कांदा कोंडी? केंद्राच्या धोरणास विरोध, लिलावापासून दूर राहण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

परवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीला भेट दिली होती. आणि आज याच पध्दतीने पण, अचानक उपमुख्यमंञी अजित पवार पुसेसावळीत दाखल होत त्यांनी या गुन्ह्यातील दोषींना योग्य शिक्षा होईल असा विश्वास दिला आहे. अजित पवार यांनी दंगलीतील नुकसानीची पाहणी केली आहे. स्थानिकांशी संवाद साधला. अशा घटना न परवडणाऱ्या असल्याने गावात शांतता, सुव्यवस्था राखली जावी. कायदा सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन पवार यांनी या वेळी केले.

Story img Loader