“शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही. ” असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.

“ विमा कंपन्यांनी त्याचं काम योग्य पद्धतीने करावंराज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी.” असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

“ज्या नुकसानीमुळे बळीराजाला, कष्टकऱ्याला पीक विमा मिळू शकतो, तो मिळाला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे.” असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Story img Loader