राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असून पुणे शहरातील अनेक चौकात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून फ्लेक्स लावून निषेध नोंदविला. तर त्याच दरम्यान आज लाल महाल येथे पतित पावन संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. त्याच दरम्यान पुण्यात एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.
हेही वाचा- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; उद्या मुंबईत समितीची पहिली बैठक
त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, एक गोष्ट स्पष्ट आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, या पृथ्वीवर आहे.तो पर्यंत महाराष्ट्र आणि देशाच्या आमच्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे राहणार आहेत. आजच्या भाषेत सांगायच झालं. तर छत्रपती शिवाजी महाराजच हिरो आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. राज्यपालांच्या मनात देखील काही शंका नाही. तसेच राज्यपालांच्या बोलण्याचे अर्थ निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहे. मला एक वाटत की, त्यांच्या मनात असे कोणतेही भाव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श देशात आणि महाराष्ट्रात असू शकत नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा- ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आदर्श’; राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप
सुधाशु त्रिवेदी यांनी देखील विधान केले असून त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सुधाशु त्रिवेदी याच म्हणणं मी नीट ऐकलं असून कोणत्याही वक्तव्यामध्ये महाराजानी माफी मागितली. असे म्हटलेलं नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या अद्याप ही झाल्या नाहीत.त्यावर ते म्हणाले की, जे बदलीस पात्र आहेत. त्या सर्वांच्या बदल्या निश्चित होतील. तसेच जे बदलीस पात्र नाहीत. त्यांच्या बदल्या होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यंतरी बदल्या झाल्या.त्यामध्ये उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांनी टीईटी घोटाळा समोर आणल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे.त्यावर ते म्हणाले की, नियमांन बदल्या केलेल्या आहेत. तुमच्यामध्ये चर्चा असून लोकांमध्ये चर्चा नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी पीएमपीचे दोन नवे मार्ग
तुम्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बदनामी बंद करा, आम्ही आम्ही आरएसएस बद्दल खर बोलण बंद करू, अशी ऑफर काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस कोण जयरा यांनी कोण रमेश म्हणत उत्तर देण टाळले.
पोलिसांकरीता स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार
७१ वी अखिल भारतीय पोलिस रेसलिंग क्लस्टर २०२२ च्या समारोप कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रिडा मंत्री गिरीश महाजन, पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह अधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
हेही वाचा- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याचे प्रयत्न; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ७१ वा ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिप स्पर्धा महाराष्ट्रामध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी चांगली झाली. २०१९ मध्ये पोलिसांकरीता स्पोर्ट कॉम्प्लेक्स करण्याच ठरवलं होते. पण त्यावेळी दुर्देवाने सरकार देखील गेले आणि कोविड देखील आला.त्यामुळे तो प्रस्ताव मंजुरीला पडलेला असून आम्ही त्याला तात्काळ मान्यता देत असल्याचे त्यांनी सांगितले.