विश्वास पवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बरड : फलटणहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा सोहळा आज गुरुवारी सातारा जिल्ह्यातील बरड येथे मुक्कामी पोहोचला. या प्रवासात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेत सारथ्य केले.

या वेळी फडणवीस यांच्या समवेत राज्य उत्पादनशुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, उपस्थित होते. दरम्यान फलटण मुक्काम आटोपून आज सकाळी पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगा वाजताच माउलींच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजवलेल्या रथात ठेवली व लगेचच सोहळा बरडकडे पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

हेही वाचा >>> छाप्यांबाबत ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडे माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

हरिनामाच्या गजरात आणि लाखो भाविक वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी मजल दरमजल करत आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. प्रवासात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेत सारथ्य केले. माउलींची पालखी आज सातारा जिल्ह्यातील बरड येथे शेवटच्या मुक्कामी पोहोचली. येथे पालखी सोहळय़ाचे उत्साही स्वागत करण्यात आले. मुक्कामस्थळी चोपदारांनी दंड उंचावताच सर्वत्र शांतता पसरली. त्यानंतर समाज आरती होऊन पालखी माउलींच्या तंबूत ठेवण्यात आली व दर्शन बारी सुरू झाली. उद्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान होणार आहे. सातारा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळा सोलापूर प्रशासनाला हस्तांतरित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis palkhi rath of saint shree dnyaneshwar mouli ysh