सातारा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर  प्रथमच आपल्या दरे (महाबळेश्वर )या मूळ गावी आले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे ही त्यांच्यासोबत आहेत.  प्रशासकीय यंत्रणेने त्यांचे स्वागत केले. हा दौरा तीन दिवसांचा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विश्रांतीसाठी आल्याचे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे येथे आगमन होताच वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी सत्ता स्थापनेच्या नाराजी नाट्यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी आले होते. मात्र त्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, अधिवेशन झालं त्यानंतर शिंदे हे गावी आले आहेत. दरेगावी मोठा पोलीस बंदोबस्त असून मुख्यमंत्र्यांचा हा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे.