राज्यात महाविकास आघाडी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अद्याप सत्तास्थापनेवेळी निर्माण झालेल्या परिस्थितीवरून आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे होत असताना दिसत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी भल्या सकाळी घेतलेल्या शपथेबाबतही अजूनही चवीने किस्से चघळले जातात. मात्र, ही बाब जशी सामान्य नागरिकांबाबत घडते, तशीच ती सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांच्या बाबतीतही घडते. तसाच काहीसा प्रकार आज विधानसभेत दिसून आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजित पवार म्हणतात, पहाट नव्हे सकाळ होती

आज संध्याकाळी ६ च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार बोलायला उभे राहिल्यानंतर त्यांनी विरोधकांच्या अनेक मुद्द्यांना उत्तर दिलं. त्यावेळी विरोधी आमदारांनी उपस्थित केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेशी संबंधित मुद्द्यावर अजित पवारांनी बोलायला सुरुवात करताच त्यांनी भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना खोचक टोला लगावला.

“विरोधी पक्षनेते आणि इतर सन्माननीय सदस्यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. मी फक्त त्यांचं एकट्याचंच नाव घेतो आणि इतर सगळ्यांची घेत नाही. नाहीतर म्हणतील हा फक्त एकाचच नाव का घेतो, आमचं तर नावच घेईना”, असं अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी!

अजित पवार यांनी असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी समोरच्या बाकांवरून बसल्या बसल्याच त्यांना कोपरखळी मारली. “तुम्ही वारंवार माझं नाव घेतलं, तर लगेच हे नवा संशय घेतील”, असं फडणवीस म्हणाले.

“आहे का इथे कुणी माई का लाल, जो म्हणेल…”, विधानसभेत सुधीर मुनगंटीवारांचा संतप्त सवाल!

अजित पवारांनी लगावला प्रतिटोला!

फडणवीसांची कोपरखळी त्याच पावली परत पाठवत अजित पवारांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना टोमणा मारला. “हो ना… नाहीतर लगेच ते मुनगंटीवारांना पहाट आठवायला लागते, आता काय करायचं? असा मिश्किल सवाल त्यांनी केला. “त्यांना एक कळत नाही.. सकाळचे ८ वाजले होते. आता आठला ते पहाट म्हणतायत हे दुर्दैव आहे. आठ वाजले होते आठ… पहाट पहाट पहाट करून त्यावर चर्चा करतात”, असं अजित पवार म्हणाले.

“मी एवढं सांगितलं तरी देखील देवेंद्र फडणवीस…”, अजित पवार यांची विधीमंडळात टोलेबाजी

तेवढ्यात विरोधी बाकांवरून कुणीतरी रात्री शपथविधी घेतल्याचंही बोलताता अशी आठवण करून दिली. त्यावर देखील लागलीच प्रत्युत्तर देत “रात्री आम्ही झोपत असतो”, असं अजित पवार म्हणाले.