अँटिलिया स्फोटकं प्रकरणामुळे अडचणीत आलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहेत. त्या प्रकरणापासून सुरू झालेल्या घडामोडी, खळबळजनक खुलासे यामुळे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही राजीनामा देऊन गजाआड जावं लागलं. याच सचिन वाझेबद्दल आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक विधान केलं आहे.


पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, “आधी काही गैरप्रकार झाला की इथे बोफोर्स झाला असं म्हटलं जायचं. अगदी खेडेगावात जरी काही झालं तरी बोफोर्स झालं म्हणायचे. आता असं म्हणतात की, याचा सचिन वाझे झाला. हा सचिन वाझे आहे. कुठुन दुर्दशा आठवली आणि त्याला सर्विसमधे घेतलं. अर्थात कायदा आपलं काम करतोय. पण एका व्यक्तीमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होतं. ते होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि चांगलं काम करा.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

हेही वाचा – आमदारांना मोफत घरं मिळणार नाहीत; अजित पवारांनी ठणकावून सांगितलं


पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालय येथे चार चाकी आणि दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

आणखी वाचा – “पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार”; अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं कारण

त्यावेळी अजित पवार त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले की, माझा स्वतःचा फोन नंबर… एका बहाद्दर पठ्ठ्याने असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं की माझ्याच मोबाईल नंबरवरून फोन केल्याच वाटलं आणि वीस लाख रुपये मागितले. पण माझ्या नंबरवरून फोन केला की कॉलर आयडीमुळे फोन नंबर येत नाही हे ज्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीला माहित होतं. चौबे का कोणाचे नाव घेतले. आता याने केला होता की आणखी कोणी केला होता काय माहित?

Story img Loader